लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या सेवाकार्याचा गौरव; जिल्हा प्रांतपाल PMJF Ln. अश्विनकुमार बाजोरिया यांची अधिकृत भेट संपन्न




खामगाव:दिनांक ०७/०३/२६ . लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या 'लीड टू सर्व', 'सर्व टू लीड' व डिस्ट्रिक्ट थीम 'लव्हिंग द वर्ल्ड' (Loving the World) या संकल्पनेला सार्थ ठरवत, खामगाव संस्कृती क्लबने समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा प्रांतपाल PMJF लायन अश्विनकुमार बाजोरिया यांनी केले. लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वार्षिक अधिकृत भेटीदरम्यान (Official Visit) ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्ह्याच्या प्रथम महिला लायन वैशाली बाजोरिया, क्लबचे अध्यक्ष PMJF लायन आकाश अग्रवाल, सचिव लायन डॉ. निशांत मुखीया, कोषाध्यक्ष लायन सी.ए. आशिष मोदी आणि क्लबच्या प्रथम महिला लायन शिल्पा आकाश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण
या भेटीचे औचित्य साधून क्लबतर्फे विविध कायमस्वरूपी सेवा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले:
जलसेवा: श्री गोरक्षण संस्थान, लांजुड येथे नूतन वॉटर टँकचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी क्लब अध्यक्ष लायन आकाश अग्रवाल यांनी १ लाख रुपयांची देणगी दिली.
भक्ती व सुविधा: श्री लाकडे गणपती मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याकरिता बाक (Seating Benches) अर्पण करण्यात आले.
शिक्षण दत्तक योजना: लायन्स ज्ञानपीठ स्कूलमधील एका गरजू विद्यार्थ्याच्या संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च लायन शिल्पा अग्रवाल आणि लायन प्रिशा मुखीया यांनी संयुक्तपणे उचलून 'विद्यार्थी दत्तक' योजनेचा शुभारंभ केला.
आरोग्य मदत: निवासी मूक-बधिर विद्यालयातील बालकास लायन सी. एम. जाधव यांच्या वतीने श्रवण यंत्राची बॅटरी प्रदान करण्यात आली.
नूतन कल्पनांनी दिली सेवेची दिशा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा प्रांतपालांनी संचालक मंडळाची (BOD) विशेष बैठक घेतली. यामध्ये मार्च महिन्यातील उपक्रम आणि भविष्यातील अजेंडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात प्रांतपाल बाजोरिया यांनी समुदायाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण पद्धतीने सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची रूपरेषा:
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्षीय भाषणात लायन आकाश अग्रवाल यांनी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेतला. सचिव लायन डॉ. निशांत मुखीया यांनी सचिवीय अहवाल, तर कोषाध्यक्ष लायन आशिष मोदी यांनी आर्थिक अहवाल सादर केला.
सन्मान आणि गौरव
क्लबच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रांतपालांच्या हस्ते सर्व सदस्यांना 'डिस्ट्रिक्ट लॅपेल पिन' देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशंसा प्रमाणपत्र आणि पिन देऊन PMJF लायन आकाश अग्रवाल, PMJF लायन नरेश चोपडा आणि झोन चेअरमन MJF लायन अभय अग्रवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी क्लब मध्ये 16 नवीन मेंबर्स चा प्रवेश डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या हस्ते सन्मान करून करण्यात आला.
या सोहळ्याचे नेटके संचालन MJF लायन वीरेंद्र शाह आणि लायन खुशबू अग्रवाल यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव लायन डॉ. निशांत मुखीया यांनी मानले. या प्रसंगी विविध कॅबिनेट अधिकारी, माजी अध्यक्ष, लेडी लायन्स आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. अशी माहिती क्लब प्रसिध्दी प्रमुख लॉ राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

Post a Comment

Previous Post Next Post