शिवाजी नगर पोलिसांची 24 तासांत कारवाई; फरार आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त

खामगाव (दि. 02 एप्रिल 2026) : शिवाजीनगर,  पोलीस स्टेशनच्या दीदी पथकाने तत्पर कारवाई करत फरार आरोपीला अवघ्या 24 तासांत अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

01 एप्रिल रोजी श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय 32, रा. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या हॉटेल व लॉजिंगमधून आरोपी सुनील विश्वनाथ नेमाणे (वय 30, रा, सजनपुरी, खामगाव) याने हॉटेल मध्ये प्रवेश मिळवून काउंटरमधून रोकड व साहित्य चोरून नेले होते.

Advt.

चोरीमध्ये 20,000 रुपयांची रोकड, एचपी कंपनीचा लॅपटॉप (35,000 रुपये) तसेच MH 12 TD 5295 क्रमांकाची रेनॉल्ट क्विड कार (2,50,000 रुपये) असा एकूण 3,05,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथक प्रमुख Api पुरी,पोहे का संदीप टाकसाळ, pc केशव झाटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी बोर्ड ,पोलीस स्टेशन राजू कोल्हे ,चालक पी सी विशाल सोनवणे, सायबर पोलीस स्टेशनचे राजू आडवे, कैलास ठोंबरे तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post