वंचित बहुजन आघाडी खामगाव तालुका/शहर आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने
खामगावात ‘शिवाजी कौन होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन
खामगाव : वंचित बहुजन आघाडी खामगाव तालुका/शहर आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवाजी कौन होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असून जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
सदर कार्यक्रम रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

إرسال تعليق