नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपा महिला आघाडीची बुधवारी शहरात रॅली
खामगाव ::- नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ उद्या भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरातून रॅली काढून जल्लोष करण्यात येणार आहे.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे देशाच्या विकास यात्रेत हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी येत्या 16,17 व 18 एप्रिल रोजी विशेष अधिवेशनसुद्धा बोलाविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल उद्या 15 एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येणार असून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून अर्जुन जल मंदिर येथून दुपारी 4 वाजता रॅलीला सुरवात होईल. महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक येथून भाजप कार्यालय टॉवर चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅली मध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरध्यक्षा सौ अपर्णाताई फुंडकर, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सारिकाताई डागा, खामगांव तालुकाध्यक्षा सौ श्रद्धा धोरण व सौ श्रद्धा जोशी यांनी केले आहे.




Post a Comment