नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपा महिला आघाडीचा खामगाव मध्ये जल्लोष
Khamgaon :- नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ १५ एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरात भव्य रॅली काढून जल्लोष करण्यात आला. विधायक चा सन्मान व नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलक आकर्षण ठरवले.या रॅलीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होत.
![]() |
| Advertise. |
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून देशाच्या विकास यात्रेत एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत भाजपा महिला आघाडीच्या वतीने मिरवणुकीद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला.


Post a Comment