राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये  पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 

खामगाव- खामगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी मध्ये काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज दि.20/4/2026 रोजी खामगाव रेस्ट हाऊस येथे राष्ट्रवादीमध्ये डॉ ज्ञानेश्वर रावणकार खामगाव तालुका सरचिटणीस यांच्या माध्यमातून लक्ष्मण कान्हेरकर यांची नियुक्ती खामगाव तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती डॉ संतोष तायडे जिल्हा उपाध्यक्ष ,धोंडीराम खंडारे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष खामगाव विधानसभा यांच्या मार्गदर्शनात तसेच गजानन धंदारे तालुका संघटक यांच्या प्रयत्नाने , आणि संजय बगाडे खामगाव तालुका अध्यक्ष यांच्या सहीने नियुक्ती करण्यात आली, सदर नियुक्त्या डॉ संतोष तायडे यांच्या हस्ते करण्यात आल्या ,खामगाव रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत सदर नियुक्त्या करण्यात आल्या,त्या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बरेचसे पदाधिकारी होते. श्री लक्ष्मण कानेरकर,,तसेच दानिश पटेल पिंपळगाव राजा यांची पिंपळगाव राजा जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष पदी यांची नियुक्ती करण्यात आली.

गोपाल एकडे यांची युवा आघाडी शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पकड ग्रामीण भागात अधिक मजबूत होणार आहे. या नियुक्त्या मध्ये सामाजिक समीकरण दिसून येत असल्याचे विचारवंत प्रतिक्रिया देत आहेत. बैठकीला उपस्थित सोपान खोटरे मोहन खोटरे तालुका उपाध्यक्ष अमोल बिचारे माजी सभापती संतोष पेसोडे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत तायडे इत्यादी बरेच पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post