शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे महसूल मंत्र्यांना राष्ट्रवादीने दिले निवेदन
आज महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बुलढाणा जिल्ह्या दौऱ्याच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेस श प चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी शेतीसाठी वापरत असलेल्या वीजबिल माफ करावे. शेतकरी सरसकट कर्ज माफी लवकरात लवकर द्यावी. त्याच बरोबर शेतकरी बांधवांच्या सुशिक्षित मुलांना लाडका भाऊ योजना सुरू करून दरमहा १० हजार रुपयांची रक्कम उदरनिर्वाहासाठी देण्यात यावी यासाठी आज डॉ संतोष तायडे, संजय बगाडे तालुका अध्यक्ष खामगाव डॉ ज्ञानेश्वर रावणकार तालुका सरचिटणीस खामगाव गजानन धंदरे तालुका संघटक, रोशन सरकटे इत्यादी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

Post a Comment