भरधाव कार च्या धडकेत दोघे जखमी 

खामगाव शेगाव मार्गावरील घटना

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: लग्न समारंभात उपस्थिती नंतर रस्त्यालगत बोलत असताना अचानक आलेल्या भरधाव कारणे दोघांना धडक दिली या धडकेत दोन जन जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. खामगाव शेगाव रोडवरील ब्रह्मांडनायक लोन समोर रात्री अकरा वाजता सुमारास ही घटना घडली. घटनेमध्ये संजय ग्यानी वय 50 व सूर्यकांत नारायण मुंडीवाले वय 53 हे दोघे जखमी झाले असून त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. कार भरधाव असल्याने नियंत्रण सुटून कार देखील पलटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळतात खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन चौकशी सुरू केली आहे.



Post a Comment

أحدث أقدم