अखेर "स्टे" मिळाला...... 

खामगाव नगर परिषद करवाढ प्रकरणावर राज्यस्तरीय हालचाल

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : खामगाव नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या मालमत्ता कर, पाणी कर, खुले प्लॉट कर तसेच ९% वाढीच्या निर्णयाबाबत राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर प्रकरणात नागरिकांकडून वाढीव करांविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही पत्रव्यवहार करून विषय राज्य शासनापर्यंत पोहोचवला होता.

नगर विकास विभागाने दिलेल्या पत्रानुसार, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात “स्थिती तपासून योग्य तो निर्णय घेण्याचे” निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर चौकशी करून अहवाल शासनाला सादर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Post a Comment

أحدث أقدم