खामगावातील चिंतामणी नगरमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा; रहिवाशांचा महावितरणला निवेदन

खामगाव : शहरातील चिंतामणी नगर परिसरात गेल्या ४-५ वर्षांपासून वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत संतप्त रहिवाशांनी महावितरण कार्यालयाला निवेदन देत तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे.



निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारीपासूनच वीज दाब कमी होऊ लागतो. त्यामुळे घरगुती वापरातील पंखे, कूलर तसेच विहिरीतील पाणी काढण्यासाठी लागणारी उपकरणे सुरळीत चालत नाहीत. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.

यावर तातडीने उपाययोजना करून दोष दुरुस्ती कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. या संदर्भात भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असेही नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

हे निवेदन खामगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post