खामगाव : नारी शक्ती वंदन विधेयकास विरोध करणाऱ्यांविरोधात शिवसेनेचा निषेध

खामगाव (ता. 21 एप्रिल 2026) : नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. याबाबत उपविभागीय अधिकारी, खामगाव यांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार हा निषेध आंदोलन पार पडले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, १६ एप्रिल २०२६ हा दिवस महिलांच्या सन्मानाचा ऐतिहासिक दिवस ठरला असता. लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा “नारी शक्ती वंदन अधिनियम” लागू होणार होता. मात्र काँग्रेस व इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण केला, असा आरोप करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच भविष्यात या विधेयकास मंजुरी मिळावी व महिलांना न्याय मिळावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, युवानेते अमोल अंधारे, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी वाघमारे, तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख अमोल फेरंग, बहादूर वाघे, शहर प्रमुख राहुल कळमकार, तसेच विकी सारवाण, पियू चव्हाण, करण छापरवाल, अभिषेक तिवारी, अजय अंबुसकर, श्वेता पाटील, रमेश अवचार, श्याम गायकवाड, निलेश भवरे, डॉ. अभिजीत महानगर, संजय घाडगे, जीवन जाधव, रवी माळवंदे, दिनेश पतंगे, अंकित पुरवार, पवन लांडे, पंकज अंबारे, आशिष लांडगे, भूषण दुतोंडे, राजेंद्र बोराडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post