संतांचे विचार मनात रुजवा- संदीपपाल महाराज
खामगाव:-धकाधकीच्या जीवनात एकमेकांच्या दूर चालले आहेत. विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी संतांचे विचार मनात रुजवणे गरजेचे आहे. असे असे प्रतिपादन सप्ताह खंजिरी वादक संदीप पाल महाराज यांनी यांनी केले
.
पिंपळगाव राजा येथील पुरातन शिव मंदिर (देवळावाला) येथे शिवपुराण कथेच्या कार्यक्रमात दिनांक 21 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता संदीप पाल महाराजांचा कार्यक्रम घेण्यात आला. संदीपपाल महाराज आपले विचार करताना म्हणाले की, पुरातन शिवमंदिरा मध्ये पंचमदास महाराजांनी नामसप्ताह सुरू केला.त्यांचा उद्देश अध्यात्मिकाचा विचार रुजण्यासाठी होता, तोच विचार अविरतपणे सुरू असून ही बाब खरोखरच आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. युवकांना उद्देशून संदिपपाल म्हणाले की, युवकास भरकटलेली आहे संतांनी दाखवलेली विचार व आई-वडिलांचे आदर्श जोपासून कार्य केले पाहिजे.आई-वडिलांचे परिवारांचे समाजात मान खाली जाऊ नये असे कृत्य करू नका. युवकांची शिक्षणाकडे ओढ निर्माण झाली पाहिजे. आपले, आपल्या परिवाराचे व समाजाचा उत्कर्ष होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले. अनाठायी खर्च करू नका. समाजात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी लग्नावर खर्च करून कर्जबाजारी होऊ नका लग्नावर खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर खर्च करून भविष्याचा विचार करा.कारण शिक्षण हे भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे. तरी त्याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन पाऊल उचलणे गरजेचे आहे. आपल्या विनोदी शैलीतून संदीपपाल यांनी युवकांना भविष्याचे मूलमंत्र दिले. प्रेम भावना निर्माण करा एकमेकांच्या विषयी द्वेष ठेवू नका,. यावेळी साथसंगत नाजूक पिसाट,हार्मोनियमवादक गणेश पिसाट,तबलावादक विकास कलाने,साथसंगत राम काळमेघ, हरीश सपकाळ,सहकार्य अशोक उईके,विश्वजित संदीपपाल गिते. यावेळी नाजुकराव पिसाट यांनी संगीताच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्यासाठी माहिती विशद केली यावेळी आयोजक समिती व पंचकोशीतील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment