शेगाव येथील वाटिका (माने) चौपाटीला भीषण आग; सात दुकाने भस्म, लाखोंचे नुकसान


शेगाव : शहरातील वाटिका जवळील माने चौपाटी परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीत एकूण सात दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. यात कृष्णा पावभाजी, सप्तशृंगी पाणीपुरी, उमाळे पान सेंटर, पवार पंजाबी छोले सेंटर, झुणका भाकर, फास्ट फूड आणि मराठा छोले सेंटर या दुकानांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी होती की काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग प्रमुख नागेश रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व दुकाने जळून खाक झाली होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post