लायन्स आय हॉस्पिटल खामगांव तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
लॉयन्स क्लब सव्हीस ट्रस्ट खामगांव व्दारे मागील १० वर्षापासून खामगांव व परिसरातील जनतेला नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटलच्या माध्यमातून नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया इ. उपक्रमाव्दारे नेत्र रुग्णांना सेवा प्रदान करित आहेत.
हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब सर्व्हिस ट्रस्ट व्दारा संचालित न.प. लॉयन्स आय हॉस्पीटल खामगांव यांचे वतीने बुधवार दि. ०८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दु. २ पर्यंत स्थानिक नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल, जि.एस.टी. ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लॉयन्स क्लब सव्र्व्हींस ट्रस्ट चे संचालक व सुप्रसिध्द नेत्र तज्ञ लॉ.डॉ. संजीव राठोड, लॉ.डॉ.सौ. सुरेखा मेंढे व लॉयन्स आय हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉ. सौ. राजश्री वानखडे हे रुग्णांची नेत्र तपासणी करणार आहेत. शिबिरात निवड करण्यात आलेल्या गरजु रुग्णांची अत्यल्प दरात नेत्रशस्त्रक्रिया न.प. लॉयन्स आय हॉस्पीटल, खामगांव येथे करण्यात येईल.
![]() |
| जाहिरात |
तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लॉयन्स क्लब सव्हीस ट्रस्ट चे अध्यक्ष लॉ. डॉ. अशोक बावस्कर, उपाध्यक्ष लॉ. दिनेश गांधी, सचिव लॉ. अशोक केला, कोषाध्यक्ष लॉ. तुषार कमाणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख तथा ट्रस्टी लॉ. उज्वल गोयनका (मो.नं. ९४२२९२०८१७), ट्रस्टी लॉ. धर्मेश शहा (मो.नं. ९९२२११२८७७) व ट्रस्टी लॉ. शैलेश शर्मा (मो.नं. ९४२२८८१२९०) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन लॉयन्स क्लब सर्व्हिस ट्रस्टचे वतीने एका प्रसिध्दीपत्रका व्दारे केले आहे.


إرسال تعليق