शंभर टक्के गुण मिळवून अनया आली अव्वल
खामगाव- येथील मातोश्री जयाबेन जिवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिर मधील विद्यार्थीनी अनया अनुप गवळी हीने इयत्ता तृतीय वर्गाच्या इंग्रजी माध्यमात उत्कृष्ट यश संपादन केले असून तिने 100% टक्के गुण प्राप्त केले आहे. संपूर्ण क्लासमधून तीने उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून वर्गातून तीचा प्रथम क्रमांक आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या सर्वच विषयांमध्ये तिने ए ग्रेड प्राप्त केले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तीच्या यशाचे श्रेय ती तिचे आई, वडील आणि ट्युशन टीचर तोडेकर आणि शाळेतील शिक्षकवृदांना देते. जनोपचार न्यूज नेटवर्क कडून अभिनंदन

إرسال تعليق