खामगाव येथे "संस्कारांनी सशक्त बालपण" चार दिवसीय समर कॅम्पचे आयोजन 

स्थानीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खामगाव सेवा केंद्राच्या वतीने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी "संस्कारांनी सशक्त बालपण" या चार दिवसीय समर  कॅम्प चे  आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प 3 मे ते 6 मे दरम्यान दररोज सकाळी 8 ते 10.30 या वेळेत ब्रह्माकुमारी सेंटर रायगड कॉलनी खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे



या समर कॅम्प मध्ये 8 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक विकास लक्षात घेऊन विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. कॅम्प मध्ये मुलांना सोप्या व रोचक पद्धतीने राजयोग ध्यान शिकविण्यात येणार असून त्यामुळे त्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल तसेच प्रेरणादायी कथा व विविध ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक व आध्यात्मिक मूल्यांची जडणघडण केली जाईल. आर्ट अँड क्राफ्ट संस्कार आधारित खेळ टीम-बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज, म्युझिकल एक्सरसाइज,नृत्य ,गीते व इतर मनोरंजक उपक्रमाद्वारे मुलांचा आत्मविश्वास व्यक्तित्व विकास व सर्जनशीलता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

जाहिरात

या कॅम्पचा मुख्य उद्देश मुलांमध्ये सकारात्मक विचारसरणी, चांगल्या सवयी व उत्तम संस्काराची जडणघडण करणे हा आहे ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल व संतुलित घडण्यास मदत होईल कॅम्पच्या शेवटच्या दिवशी 6 मे रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत पालकांसाठी "संस्कारवान, आत्मविश्वासी व आनंदी मुलांची जडणघडण" या विषयावर विशेष पॅरेंटिंग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे या सत्रांमध्ये पालकांना मुलांच्या विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले जाणार आहे .खामगाव सेवा केंद्राच्या संचालिका शकुंतला दीदी यांनी ब्रह्माकुमारीजद्वारे आयोजित निशुल्क समर कॅम्प चा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم