खामगाव विधानसभेत शिवसेनेचा प्रथमच भव्य BLA बूथप्रमुख मेळावा उत्साहात संपन्न
खामगाव: शहरातील देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे खामगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच BLA-2 बूथप्रमुख यांचे प्रशिक्षण शिबिर व भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला. खामगाव विधानसभेत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर BLA बूथप्रमुखांचा मेळावा पार पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
दुपारी १.३० वाजताची वेळ आणि तब्बल ४४.४५ अंश सेल्सिअस तापमान असतानाही भर उन्हात बूथप्रमुख व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महिलांसह युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
यावेळी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. त्यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांसाठी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांचा उल्लेख करत संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.प्रशिक्षण शिबिरास शिवसेना पश्चिम विदर्भ सचिव. वैभव थोरात, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख श्री. संजय सोनार, पश्चिम विदर्भ समन्वयक संजय अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.BLA-1 पदावर नियुक्तीनंतर अॅड. अमोल अंधारे यांनी उत्कृष्ट नियोजन करत हा भव्य BLA-2 बूथप्रमुख मेळावा यशस्वी केला. त्यांना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राज्यभर सुरू असलेल्या SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर बूथनिहाय शिवसेना BLA नेमणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. BLA नेमणूक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि पुढील कार्याची दिशा यावरही सखोल चर्चा झाली.या मेळाव्यामुळे खामगाव विधानसभेत शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



Post a Comment