खामगांव शहरात पहिल्यांदा अग्रवाल महिला बहु मंडळ द्वारे गोमाता चुनरी मनोरथ संपन्न

खामगांव - अग्रवाल महिला व बहु मंडळाच्या वतीने दि.१८ मे रोजी स्थानिक गौरक्षण संस्थान घाटपुरी येथे भव्य दिव्य गौ माता चुनरी मनोरथ कार्यक्रम भक्ती आणि उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिला, समाजातील सदस्य आणि भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संध्या गोयनका, सौ. संगीता अग्रवाल, सौ. सरिता मोदी, सौ. अनिता केडीया, सौ. सपना धानुका, सौ. साधना गाडोदीया आणि सौ. सविता अग्रवाल तसेच बहु मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरिता अग्रवाल, सौ. शिल्पा अग्रवाल, सौ. सुरभी गोयनका, सौ. रिंकी झुनझुनवाला, सौ. खुशबु अग्रवाल, सौ. रश्मी अग्रवाल, सौ. मयुरी टिबडेवाल यांनी अथक परिश्रम घेतले.याप्रसंगी अग्रवाल समाज अग्रसेन भवन मंडळाचे अध्यक्ष सुरजजी अग्रवाल आणि गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेशजी धानुका यांच्यासह गोसेवा कार्यात सक्रीय असलेल्या सर्व व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान भोजन प्रसादीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ज्याचा उपस्थितींनी लाभ घेतला. तसेच यावेळी छप्पन भोग प्रसादाचे सुध्दा वितरण करण्यात आले. मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि व्यापक समाजाच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. उपरोक्त माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post