राष्ट्रीय मीडिया परिषदेत डॉ. राजेश राजोरे आणि डॉ. वडनेरे संकलित 

‘सिधी बात शायरी के साथ’ पुस्तकाचे प्रकाशन

माउंट आबू : ब्रह्माकुमारीज मीडिया विंगतर्फे ज्ञान सरोवर येथे दि. ३० एप्रिल ते ४ मे २०२६ या कालावधीत आयोजित राष्ट्रीय मीडिया परिषदेत 1 मे च्या उद्घाटन सत्रात  ‘सिधी बात शायरी के साथ’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले.

 या ग्रंथाचे प्रकाशन बी. के. करुणा भाईजी, अध्यक्ष मीडिया प्रभाग, बी. के. शंतनु भाई राष्ट्रीय समन्वयक, बी. के. सरला दीदी, डॉ. मानसिंह परमार (माजी कुलगुरू, कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंपर्क विद्यापीठ, रायपूर), राज्यसभा सदस्य हरियाणा सुभाष बारला, बी.के. शिलू दीदी, नरेश कौशल संपादक ट्रीब्युन चंदीगड, मनीष बाजपेयी, बी के सुदेश दीदी, तनया पटनायक भुवनेश्वर यांच्या शुभहस्ते पार पडले.

      या पुस्तकात आध्यात्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांच्या मंच संचालनासाठी व भाषणासाठी अत्यंत उपयुक्त अशी सुमारे 1150 शायरी आहे.ब्रह्माकुमारीजच्या मंच संचालन करणाऱ्या बहिणींच्या गरजा लक्षात घेऊन, यामध्ये प्रसंगानुरूप प्रभावी शायरी, दोहे  आणि काव्यपंक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या शायरीचे संकलन डॉ. राजेश राजोरे यांनी त्यांच्या सरळ सरळ या साप्ताहिक स्तंभातून व डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केलेले आहे.    या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथाच्या माध्यमातून सकारात्मक विचार, मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाचा संदेश शायरीच्या रूपाने अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला .कार्यक्रमाचे संचलन बी. के. मंजू दीदी बिलासपूर यांनी कुशलतेने केले.

   या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील पत्रकार, संपादक आणि मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, त्यांचे उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.



Post a Comment

Previous Post Next Post