श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरास बंदी!
शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानने मंदिर परिसरातील पावित्र्य अबाधित राखण्यासाठी तसेच भाविकांना श्रींचे सहज, सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईलमुळे होणारी गर्दी, फोटो-व्हिडिओ काढण्याची लगबग आणि त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी संस्थानने ही नियमावली लागू केली आहे.
संस्थानने सर्व भाविकांना या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, मंदिराचे पावित्र्य जपत शांततेत आणि भक्तिभावाने दर्शन घेण्याचे आवाहन केले आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून व्यवस्थापनास सहकार्य करावे, असेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment