खामगावात तीन दिवसांपासून घंटागाड्या बंद; चालक-हेल्परचे पगार रखडल्याने कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
खामगाव(नितेश मानकर) शहरात गेल्या तीन दिवसांपासून घंटागाड्या बंद असल्याने शहरातील कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. चालक व हेल्पर यांचे पगार रोखल्यामुळे त्यांनी काम बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचू लागले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
घंटागाड्या बंद असल्याने नागरिकांना घरगुती कचरा टाकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
चालक व हेल्पर यांचे रखडलेले पगार तात्काळ देण्यात यावेत आणि घंटागाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे.
नगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थापनातील या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा, अन्यथा शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खामगावातील हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment