खामगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठीचे उपोषण अखेर मागे; नामदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते सोडविले उपोषण

खामगाव जनोपचार: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या  पुतळ्याच्या उभारणीसाठी खामगाव येथे गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर आज नामदार अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते सोडविण्यात आले. हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळाल्याने आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी नामदार आकाशदादा फुंडकर यांनी नगरपरिषद जवळील नाट्यगृहाच्या दक्षिण दिशेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासनाला दिले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पुरी, उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजू पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, कार्यकारी अभियंता तळीले आदी मान्यवर उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आंदोलकांनी समाधान व्यक्त करत नामदार फुंडकर यांचे आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم