सरस्वती विद्या मंदिरात प्रज्ञाश्री पुरस्कार सोहळा संपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : स्थानिक मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिर खामगांव येथे शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी प्री-प्रायमरी विभाग तसेच वर्ग ९ वा या वर्गांचा संस्कृती ज्ञान स्पर्धा परीक्षा पुरस्कार व प्रज्ञाश्री पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला. तसेच 'रस्ता सुरक्षा अभियान' तर्फे घेण्यात येणा-या परिक्षेत कमांक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खामगांव एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मा. अॅड. श्री. विनायकजी सावजी, प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. शोभाताई कुळकर्णी (मराठी माध्यम माजी प्रधानाचार्या) उपस्थित होते. तसेच आपल्या शाळेच्या प्रधानाचार्या सौ. सुषमाताई टिकले, सौ. मेधाताई गोटी व सौ. दिपाताई धारव व श्री. मुरकर सर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकातून बोलतांना शाळेच्या प्रधानाचार्या सौ. सुषमाताई टिकले यांनी पुरस्काराचे स्वरूप स्पष्ट करून दिले. तसेच पुरस्कारप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. प्रज्ञाश्री पुरस्कार प्राप्त वर्ग ९ वी तील प्रथम कर्माक कु. अदिती अतुल तांबट व चि. विवेक अतुल इंगळे, द्वितिय क्रमांक कु. वंशाली रविंद्र कार्डलकर व कु. अक्षरा विलास जाधव तसेच तृतीय क्रमांक कु. अंशिका विरोचन जाधव व कु. वृषाली बबन भोकरे यांना पुरस्कार प्राप्त झाले. प्रज्ञाश्री पुरस्कारामध्ये कै. मंदार श्याम कुळकर्णी व स्व. यश अमोल खेतान स्मृती पुरस्कार शिशुवर्ग लहान गटातील कु. शौर्या गणेश फाटे, मधल्या गटातील चि. पियुष अतुल संत यांना प्रदान करण्यात आला. शिशुवर्ग मोठा गट प्रथम क्रमांक चि. राजाऊ आकाश मावस्कार, द्वितीय कमांक चि. देवांश ईश्वर राजपुत, व तृतीय क्रमांक कु. आहाणा कपिल सातळे, नर्सरी प्रथम क्रमांक कु. श्रीजा अनिकेत धानोरकर, चि. शिवांश श्रीकांत राउत द्वितिय, व कु. रिदधी अनिल भगत तृतीय पुरस्कार देण्यात आला. तसेच K.G. I (A) मधील प्रथम पुरस्कार चि. प्रसन्न अमोल धोटे, द्वितीय पुरस्कार कु. जानवी सतिश खवले, व तृतीय पुरस्कार कु. कृष्णाली मयुर खेडकर, K.G. I (B) प्रथम पुरस्कार चि. प्रसाद सागर धोटे, द्वितीय पुरस्कार चि. वंश दिलीप पायघन, तृतीय पुरस्कार चि. प्रणव मुकेश बरडिया, K.G. II (A) मधील प्रथम पुरस्कार कु. उर्वि शशि सपकाळ, द्वितीय पुरस्कार कु. शिवाज्ञा सचिन माने, तृतीय पुरस्कार कु. निधी नंदकिशोर चोरे, K.G. II (B) मधील प्रथम पुरस्कार कु. गार्गी परमानंद वाकेकर, द्वितीय पुरस्कार चि. आनंदगिर सिंग अ. ठाकुर, तृतीय पुरस्कार कु. तन्वी विजय पारसकर हे सर्व विद्यार्थी प्रज्ञाश्री पुरस्काराचे मानकरी ठरले.

वर्ग ९ वी मधील प्रथम आणि तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना स्व. प्रभावतीताई पांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तर सर्व वर्गाचे द्वितीय पुरस्कार कै. श्री. अण्णासाहेब उर्फ वा. दे. कुळकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच इतर वर्गाचे प्रथम व तृतीय पुरस्कार स्व. श्रीमती गंगुताई देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आले.

असे एकुण २६ प्रज्ञाश्री पुरस्कार या शैक्षणिक सत्र २०२५-२६ चे विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. कार्यकमाचे संचालन सौ. दिपाली प्रशांत लाहुडकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ. भाग्यश्री शेटटे यांनी केले. तसेच सौ. फाटेताई, श्री इंगळे सर व श्री. सातळे सर या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post