खामगावात उद्या वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता

खामगाव : देखभाल, दुरुस्ती तसेच पूर्व मान्सून कामांसाठी उद्या दि. ०४ मे २०२६ रोजी GIS सब-स्टेशनला विद्युत पुरवठा करणारी ३३ के.व्ही. लाईन सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

या कालावधीत GIS सब-स्टेशनमधील सर्व ११ के.व्ही. फीडरचा लोड पर्यायी फीडरवर टाकून बॅक-फीडिंगद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित ११ के.व्ही. फीडरचा वीजपुरवठा सकाळी ८.०० ते १२.०० या वेळेत पूर्णतः बंद राहू शकतो.महावितरणच्या फरशी विभागाने नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post