गुटखा विक्री प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
खामगाव : गुटखा विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालय, खामगाव यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. एस. डी. गावंडे व अॅड. एम. यू. इंगळे यांनी काम पाहिले.
खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकापूर येथे १४/०९/२०२२ रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका किराणा दुकानावर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत सागर शामराव हिवराळे यांच्या दुकानातून सुमारे ७ हजार ४४२ रुपयांचा विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. आरोपीचे वकील अॅड. एस. डी. गावंडे यांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायालय, खामगाव यांनी २८ मे २०२६ रोजी निकाल देत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.


Post a Comment