नर्सी नामदेव येथे जीवघेण्या मारहाणीप्रकरणी मुख्य आरोपीस शिक्षा

 जिल्हा न्यायालयाचा निकाल; ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपयांचा दंड

हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथे घडलेल्या जीवघेण्या मारहाणीच्या प्रकरणात मा. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी मुख्य आरोपीस दोषी ठरवत ६ महिन्यांच्या सक्त कारावासाची व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नर्सी नामदेव ते कडती जाणाऱ्या रोडवर कायथू नदीच्या पुलाजवळ फिर्यादी भुजंग पडघान हे त्यांच्या एम.एच. ३८-३७२० क्रमांकाच्या वाहनाने जात असताना दिनांक ७ मार्च २०१६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून त्यांचा पाठलाग करत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाण केली होती. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. चकोर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने साक्षीदार तपासून भक्कम पुरावे सादर केले.

या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी सम्राट अशोक श्रीरंग जावळे (वय २५, रा. कडत गवळी, ता. जि. हिंगोली) यास दोषी ठरवत शिक्षा सुनावली. तसेच इतर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना सहाय्यक सरकारी वकील एस. डी. कुंटे व सविता देशमुख (जाधव) यांनी सहकार्य केले. तसेच पोलीस ठाणे नर्सी नामदेवच्या पथकानेही तपासात मोलाची मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post