दहावीच्या परीक्षेत लॉयन्स ज्ञानपीठचे घवघवीत यश

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- येथील लॉयन्स ज्ञानपीठ विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. या परीक्षेत १४५ विद्यार्थी बसले असून, सर्व विद्यार्थी चांगल्या गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले. त्यातील १११ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य सूचीमध्ये स्थान मिळविले. यातील २८ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यालयातील प्रतिभाशाली विद्यार्थिनी शाश्वती गिरीश पवार हिने १७.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, तर प्रसन्न नीलेश ढवळे याने ९६ टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान पटकावले. तसेच पलाश वानखेडे व समर्थसिंग तोमर याने ९५.४० टक्के गुण मिळवून तृतीय स्थान मिळवले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्या, शिक्षक व पालकांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post