सिनेमॅटोग्राफीसाठीचे आकर्षण ठरतेय खामगावचे नटराज गार्डन
नैसर्गिक सौंदर्यामुळे चित्रिकरणासाठी वाढती पसंती
खामगाव (नितेश मानकर) शहरातील नटराज गार्डन हे सध्या सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफीसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हिरवाईने नटलेले विस्तीर्ण परिसर, मनमोहक फुलांची सजावट, शांत वातावरण आणि आकर्षक रचना यामुळे हे ठिकाण छायाचित्रकार तसेच व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांसाठी विशेष पसंतीचे ठरत आहे. लग्न समारंभ, प्री-वेडिंग शूट, अल्बम शूट तसेच लघुपट आणि गाण्यांच्या चित्रीकरणासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे.
नटराज गार्डनचे नैसर्गिक सौंदर्य आणि देखभाल पाहून येथे येणारे पर्यटकही भारावून जात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही शांत आणि प्रसन्न वातावरण असल्याने अनेक जण खास फोटोशूटसाठी या ठिकाणाला पसंती देत आहेत. खामगावच्या सौंदर्यात भर घालणारे हे गार्डन आता सिनेमॅटोग्राफीच्या दालनात आपले वेगळे स्थान निर्माण करत असून शहराच्या पर्यटन ओळखीला नवी झळाळी देत आहे.

Post a Comment