जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल
बुलढाणा: येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय (मुले) यांचा फेब्रुवारी २०२६ मधील इयत्ता बारावी (एचएससी) विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विज्ञान शाखेत गौरी कुलकर्णी हिने ९१.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हर्ष चांडक (९१.२७ टक्के) द्वितीय, विवेक बुंदे (८९.८३ टक्के) तृतीय ठरला. तसेच आर्य वाघ (८७.६७ टक्के), श्रावणी देशमुख (८७.३३ टक्के), स्नेहल वर्मा (८५.६१ टक्के), सार्थक अमृतकर (८४.५० टक्के) आणि राधिक उखरडे (८१ टक्के) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
![]() |
| जनहितार्थ |
कला शाखेचाही निकाल उत्कृष्ट लागला असून तो ९७.७५ टक्के आहे. या यशासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू तायडे तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या परिश्रमांना यशाची ही पावती मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.दरम्याn.नेरकरसर,तांबेकरसर,पडघानसर,पाचपोळेसर,घरडे मॅडम,गौरमॅडम,सावळेमॅडम,यांनी शुभेच्छा दिल्या


إرسال تعليق