खामगाव (वन्यजीव) परिसरातील ज्ञानगंगा अभयारण्यात ३ मे २०२६ रोजी जागतिक बिबट्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याचे वैभव असलेल्या या अभयारण्यात सध्या सुमारे ४० ते ४५ बिबट्यांची संख्या स्थिर असल्याची माहिती आहे. बिबट्यांचे संरक्षण, जनजागृती आणि संवर्धन यासाठी वन विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे अभयारण्यात बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या निमित्ताने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. दीपेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील पाणवठ्यांची स्वच्छता करण्यात आली तसेच त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात वनपाल व वनरक्षकांनी सक्रिय सहभाग घेत मोलाची कामगिरी बजावली.
बिबट्या हा जंगलातील पर्यावरण संतुलन राखणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. “चला, बिबट्यांचे संरक्षण करूया, कारण तेच आपल्या जंगलाचे रक्षण करतात,” असा संदेश यावेळी देण्यात आला

إرسال تعليق