HSC परीक्षेत नयना रतनकर हिला उत्तम यश

खामगाव परिसरातील नयना धनराज रत्नाकर हिने बारावी (HSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अमरावती विभागातून परीक्षेला बसलेल्या नयनाने एकूण 600 पैकी 428 गुण मिळवत 71.33 टक्के गुणांसह उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.

तिच्या विषयानुसार गुणांमध्ये हिंदी (83) आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट (82) या विषयांत विशेष प्राविण्य मिळाले आहे. तसेच इंग्रजी (64), इकॉनॉमिक्स (65), बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी (68) आणि सेक्रेटेरियल प्रॅक्टिस (66) या विषयांतही समाधानकारक कामगिरी केली आहे.

नयनाच्या या यशाबद्दल तिच्या कुटुंबीयांकडून तसेच शिक्षक व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم