पातोंडा गावचा नागेश बघे पोलीस शिपाई पदासाठी निवड; जिद्द आणि मेहनतीचे स्वप्न झाले साकार


खामगाव (अनिल मुंडे )तालुक्यातील पातोंडा येथील नागेश पंढरी बघे याची नागपूर येथे पोलीस शिपाई पदासाठी निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत नागेशने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. लहानशा गावातून येत असताना कोणतेही विशेष मार्गदर्शन नसणे, तसेच घरात कोणीही उच्चशिक्षित नसतानाही त्याने हार न मानता सातत्याने अभ्यास व मेहनत सुरू ठेवली.

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याने नागेशवर गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्याने मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पातोंडा गावासह परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून नागेश बघे याचे कौतुक करण्यात येत असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

أحدث أقدم