सरस्वती विद्या मंदिराची सलग १४ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: येथील मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता, सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सलग १४ व्या वर्षीही शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील दहाव्या वर्गातून ओम विनोद चेतवाणी याने ९५.६० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम, सुशांत नितीन भारसाकळे ९४.६० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर आर्या वैभव कारंजकर ९४.२० टक्के गुण मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले आहे. तसेच ७ विद्यार्थी ९० टक्केच्या वर गुण मिळवून कौतुकास पात्र ठरले आहेत, तर ४० विद्यार्थी डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये आले आहेत.

Advt.

शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे खामगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश तायडे, उपाध्यक्ष डॉ. संजीव भोपळे, सचिव कैलास ढोले, कोषाध्यक्ष विनायक सावजी, शाळेचे संचालक मंडळातील सदस्य, तसेच शाळेच्या प्रधानाचार्या सुषमा संदीप टिकले, मेघा गोटी, दीपाली धारव, संदीप मुरकर तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم