शौर्य प्रशिक्षण वर्गातील तरुणांचे हिंदू राष्ट्र सेनेतर्फे जल्लोषात स्वागत
खामगाव : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आयोजित शौर्य प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेल्या तरुणांचे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पवर्षाव करून तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु तेगबहादुरजी यांच्या जयघोषासह "भारत माता की जय" आणि "वंदे मातरम्"च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या स्वागत सोहळ्यामुळे शहरात हिंदू एकता आणि अखंडतेचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते रवी माळवंदे, राजेश तांबटकार, सागर बेटवाल, आनंदसिंह चव्हाण, कैलास भाऊ बेरोज्या, सुरज भैय्या यादव, सोनू भाऊ चव्हाण यांच्यासह गौरक्षक, रुग्णसेवक व धर्मसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तरुणांना राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

Post a Comment