खामगावात सफाई कामगारांवरील अन्यायाच्या निषेधार्थ एकदिवसीय धरणे आंदोलन
खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये सफाई कामगारांसोबत एका नगर सेवकाने केलेल्या प्रकाराचा निषेधार्थ तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील मेहतर समाज व सफाई कामगार वर्गावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात आज sdo कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
२७ मे २०२६ रोजी सफाई कामगार मुकदम सुनील रमेश उज्जैनवाल व इतर कर्मचाऱ्यांसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच संबंधितांना न्याय मिळावा आणि शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले जावे, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव व सफाई कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनातून सफाई कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. जर प्रशासनाने दाखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशार संघटनेचे संजय तंबोले व मोहन अहिर यांनी दिला.

Post a Comment