आग लागून गुरांचा चारा व शेती साहित्य नेस्तनाबूत
खामगांव:- कल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण करून शेतातील गुरांचा चारा व साहित्याची राख रांगोळी केली. तालुक्यातील किन्ही महादेव येथील शेतकरी संजय गव्हाणे यांच्या शेतात घडली काल सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये शेतातील शेती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये जनावरांचा चारा आगीत जळून खाक झाला .तर 2 म्हशी काही प्रमाणात आगीत होरपळल्या तसेच स्प्रिंकलर संच,ठिबक संच, गुरांचा गोठा,फवारणी पंप, विद्युत केबल, सोयाबीन बिजवाई, रासायनिक खतांच्या बॅग इत्यादी जळुन जवळपास 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानाची त्वरित भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी संजय लक्ष्मण गव्हाणे यांनी केली आहे.

Post a Comment