खाकीतला माणूसकीचा चेहरा; DYSP प्रदीप पाटील यांचे शासकीय रुग्णालयात रक्तदान

खामगाव : पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले DYSP प्रदीप पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत शासकीय रुग्णालयात रक्तदान करून माणुसकीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

रक्तदानानंतर रुग्णालय प्रशासनाच्या वतीने DYSP प्रदीप पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना “रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येकाने नियमित रक्तदान करून गरजूंचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असा संदेश दिला.

त्यांच्या या कृतीमुळे पोलिस दलाचा संवेदनशील आणि समाजाभिमुख चेहरा पुन्हा एकदा समोर आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे सांगितले.“रक्तदान करा... जीवन वाचवा” असा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post