अधिक जेष्ठ मास निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ

खामगांव - श्री यमुना महिला सत्संग मंडळ तथा श्री मदनमोहन मंदीर खामगांव द्वारे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञाचे आयोजन स्थानिक श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगांव येथे आयोजीत करण्यात आले आहे.


श्रीमद् भागवत कथा दि. ६.६.२०२६ ते दि. १२.६.२०२६ पर्यंत राहील तसेच श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ दि. १३.६.२०२६ रोजी राहणार आहे. कथा प.पु.गोस्वामी १०८ श्री वागधीशरायजी महोदयश्री (विशालबाबा) चेन्नई यांच्या अध्यक्षतेखाली व कथा वाचन वेदांताचार्य श्री गिरीराजजी शास्त्री बडौदा हे करतील. कथेची वेळ दररोज दुपारी ३ ते ७वाजेपर्यंत राहील.


अधिक जेष्ठ मास निमित्त श्री मदनमोहन मंदिर हवेली सराफा खामगाव येथे विविध मनोरथाचे दर्शन सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत राहील. शोभायात्रा शनिवार दि. ६.६.२०२६ सकाळी ९ वाजता श्री मदनमोहन मंदीर पासुन सुरूवात होणार आहे. अधिक माहितीकरीता नंदकिशोर गायेनका, कृष्णकांत भट्टड, सतिषभाई सांगाणी, विपुलभाई जोबनपुत्रा, उमेशभाई बरालिया यांच्याशी संपर्क साधावा. वरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री मदनमोहन मंदीर खामगांव तर्फे करण्यात आले आहे. उपरोक्त माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post