शिवसेनेचा बांधकाम कामगार जिल्हा अधिकाऱ्यांना घेराव,खऱ्या कामगारावर नोंदणीमध्ये होत असलेल्या अन्याबाबत विचारणा.



दि.20/05/2026 रोजी बांधकाम कामगार अधिकारी यांना शिवसेनेने जिल्हा प्रमुख संतोष डिवरे यांच्या नेतृत्वात घेराव घालत विविध प्रश्नावरती विचारणा केली. 

कामगार नोंदणी मध्ये होत असलेल्या दुजाभावावर आक्रमक पवित्र घेत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेमध्ये खरे लाभार्थी सोडून चुकीच्या लोकांना व कार्यकर्ते यांना योजनेचा लाभ देत आहेत.योजना सरकारची आहे त्यामध्ये गरजू लाभार्थी समाविष्ट झालीच पाहिजे,परंतु प्रत्येक कॅम्प स्वतःकाही राजकीय पक्षाचा घरच्या योजने प्रमाणे वापर करून फक्त राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. योजना सरकारी आहे म्हणून खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

परंतु इथे अत्यंत गरजू खरा  लाभार्थी वंचित आहे.

फक्त योजना ही कागदोपत्री असून तोंड पाहून योजनेचा लाभ देत आहेत. योजना फक्त कार्यकर्त्याकरिताच आहे का असा सामान्य कामगारांना पडलेला फार मोठा प्रश्न आहे. कारण इतर कुठल्या राजकीय पक्षाचा खरा लाभार्थी असला तरी त्याला योजनेचा लाभ मिळत नाही हा खरोखर खऱ्या लाभार्थ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय आहे.पूर्ण महाराष्ट्रभर बांधकाम कामगार मंडळ मुंबई इथून साईट बंद असून खामगाव मधेच कामगार मंडळाची साईट कशी काय सुरू आहे,आणि काही ठराविक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्ते यांना योजनेचा लाभ सुद्धा देत आहेत.याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना आक्रमक झाली असून खऱ्या गरजूंना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळावा तसेच बांधकाम कामगार महाराष्ट्र मंडळ समिती अध्यक्ष,सचिव यांनी हेतू प्रस्पर होणारा अन्याय थांबवावा  तसेच बांधकाम कामगार बुलढाणा जिल्हा ऑफिस अंतर्गत होणाऱी नोंदणी लवकरात लवकर सुरू करून जाचक अटी त्यातून वगळाव्या,तसेच सामान्य नागरिक यांना वारंवार ऑफिसच्या चकरा माराव्या लागतात.

तरी सुद्धा वारंवार ऑनलाईन अर्ज  करून अर्ज त्रुटी काढून नामंजूर करण्यात येतो.एजेंट कडून काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून लाभार्थ्याकडून देवानघेवाण होते. काही जुने लाभार्थी यांनी कॉलरशिप हॉस्पिटल इतर बिल  योजनेमार्फत सादर केल्यास त्याची सुद्धा अधिकारी कर्मचारी चिरी मिरी करून घेतात.एजंट बंद करून सामान्य कामगार लाभार्थ्यांकरिता जाचक अटी स्थितील करून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता साईट 24 तास सुरू ठेवावी. व सर्वसामान्य कामगारांना लवकरात लवकर लाभ द्यावा अन्यथा सर्व खरे बांधकाम कामगार घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल व अद्याप पर्यंत ज्यांना लाभ मिळाला नाही अशा सर्वांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल याची दक्षता संबंधित मंडल अध्यक्ष,सचिव व बांधकाम कामगार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.

यावेळी शिवसेना नेते अमोल अंधारे शिवसेना तालुका प्रमुख खामगाव राजेंद्र बघे,शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकार,बांधकाम कामगार विदर्भ प्रमुख सचिन विटे, बांधकाम कामगार जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील फरफट,शिवसेनेचे पिंटू पाटील धोरण,शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश काळे,परमेश्वर घोरपडे शिवसेना बां का सेना जिल्हा उप प्रमुख,शुभम वावरे शिवसेना बां का सेना जिल्हा सचिव,मंगेश वानखडे शिवसेना बां का सेना तालुका प्रमुख,संतोष पवार शिवसेना बां का सेना शेगाव तालुका प्रमुख आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post