“कॉकरोच जनता पार्टी शेगावात होणार दाखल” पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

शेगाव : सध्या सोशल मीडियावर “कॉकरोच जनता पार्टी शेगावात होणार दाखल” अशा आशयाची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात असून अनेकजण या पोस्टची सत्यता पडताळून पाहत आहेत. काहींनी याकडे विनोदी आणि उपरोधिक राजकीय टोला म्हणून पाहिले आहे, तर काहींनी यामागे नेमका उद्देश काय, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत असून काहींनी मिश्कील टिप्पणी करत पोस्ट शेअर केली आहे. मात्र, “कॉकरोच जनता पार्टी” नावाची कोणतीही अधिकृत राजकीय संघटना किंवा शेगावात अशा प्रकारच्या पक्षाच्या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या पोस्टमागे नेमके कोण आहे आणि ती केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आली आहे की त्यामागे अन्य काही हेतू आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post