खामगावचे भावेश चव्हाण यांना पीएच.डी. पदवी जाहीर
खामगाव: भावेश काशीनाथ चव्हाण यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथून कॉमर्स विषयात पी.एच.डी. (Ph.D.) पदवी संपादन केली आहे.
चव्हाण यांनी बिझनेस मॅनेजमेंट विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी घोषित केली.
भावेश चव्हाण यांचे शिक्षण B.Sc. आणि MBA (Finance) असे झाले असून, त्यांच्या या यशामुळे खामगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment