डीवायएसपी प्रदीप पाटील व ठाणेदार रामकृष्ण पवार यांची धडाकेबाज कारवाई:  कत्तलीसाठी जाणारे 14 गोवंश मुक्त; तिघांवर गुन्हा

खामगाव शहर पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई करत गोवंश तस्करी करणारी तीन वाहने ताब्यात घेतली. टॉवर चौक परिसरात नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी केली असता ही कारवाई उघडकीस आली. या कारवाईमुळे गोवंश तस्करांचे मोठे रॅकेट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन वाहनांमधून एकूण 14 गोवंशांची सुटका करण्यात आली. कारवाईदरम्यान सुमारे 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनांसह संबंधित आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोवंशांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. पहाटेच्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.



Post a Comment

أحدث أقدم