खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27 वा वर्धापन दिन बुधवार, दि. 10 जून 2026 रोजी खामगाव येथे विविध विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना संघटित करणे तसेच जनतेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खामगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व पदसिद्ध सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दि. 10 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी भवन, गांधी चौक, खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पुंजाजी टिकार (खामगाव विधानसभा अध्यक्ष), संजय गव्हांदे (शेगाव तालुका अध्यक्ष), श्रीमती सरस्वतीताई खासणे (शहराध्यक्षा, खामगाव), सौ. शारदाताई शर्मा (महिला शहराध्यक्षा) तसेच विजय काटोले (माजी सभापती, शेगाव पंचायत समिती) यांनीही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment