विहिरीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह; रुख्मिणी फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमची तत्पर

खामगाव, दि. 10 जून: खामगाव तालुक्यातील प्रीप्री देशमुख येथील प्रतीक उर्फ यश सुरेश कराळे (वय 24) हा युवक 9 जूनपासून बेपत्ता होता. नातेवाईक व ग्रामस्थांकडून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात येत असताना गावालगतच्या एका विहिरीमध्ये आज (10 जून) त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

घटनेनंतर रुख्मिणी फाउंडेशन, खामगावच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होत अवघ्या 15 मिनिटांत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. या मोहिमेत रमेश अवचार, संजय खंडेराव, अवि ठाकूर, अमर पिंपळेकर, ओम अवचार व सुमित घाटोळ यांनी सहभाग घेतला. दरम्यान, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्रिशूल ठाकरे, किरण राऊत व मनीष कवडकार यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.



Post a Comment

أحدث أقدم