शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि सामान्य रुग्णालय परिसरात दि. 18 मार्च 2022 रोजी घडलेल्या प्रकरणात राहुल पुंजाजी कळमकार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी भादंवि कलम 186, 188, 353 व 506 अन्वये गुन्हा नोंदविला होता. तपास अधिकारी एपीआय रविंद्र लांडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविली. मात्र, उपलब्ध पुरावे व साक्षींचा विचार करता आरोपीविरुद्धचा गुन्हा शंकातीतपणे सिद्ध झाला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे वि. तदर्थ जिल्हा तथा सत्र न्यायाधीश कोकरे यांनी दि. 20 जून 2026 रोजी सबळ पुराव्याअभावी राहुल पुंजाजी कळमकार यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. संजयकुमार बडगुजर, अॅड. दीपक साठे व अॅड. अमोल उमाळे यांनी बाजू मांडली.
إرسال تعليق