गो. से. महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

खामगाव : गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे २१ जून रोजी ‘Yoga for Healthy Ageing (स्वस्थ आयु के लिए योग)’ या संकल्पनेवर आधारित १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. हा उपक्रम राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS), क्रीडा व रंजन विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्नल उमेश शुक्ला, कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक पडघन तसेच योग प्रशिक्षक श्री. अजय डवरे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अल्पोपहाराची व्यवस्था DCB बँकेच्या अधिकारी नीता वर्मा यांनी केली होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक पडघन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योगामुळे मानसिक स्थैर्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होण्यास मदत होते, असे सांगितले.यानंतर योग प्रशिक्षक श्री. अजय डवरे यांनी शासनाच्या योग प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, प्राणायाम, ध्यान साधना, ओंकार उच्चार तसेच भ्रामरी प्राणायामाचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले.यावेळी प्रमुख अतिथी कर्नल उमेश शुक्ला (कमांडिंग ऑफिसर 13 महाराष्ट्र बटालियन खामगाव) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होते. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी व सक्षम नागरिक बनावे. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योग हे आरोग्यपूर्ण जीवनाचे प्रभावी साधन आहे.”*कार्यक्रमाचे संचालन डॉ. अशोक पडघन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या उपक्रमात गो. से. महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग, क्रीडा व रंजन विभाग तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगमधील 100 हून अधिक विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. योग दिनाचे नियोजन NCC ऑफिसर लेफ्टनंट सुहास पिढेकर, डॉ. अशोक पडघन, डॉ. संजय वराडे, डॉ. देवनंदन आढाव, डॉ. नीता बोचे, डॉ. रोहिणी धरमकर आणि डॉ. अनुराग बोबडे यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCC कॅडेट JUO विश्वजीत इंगळे, JUO राष्ट्रपाल गवारगुर, प्रतीक बुरुकले, CPL मनीष भोपळे, कळसकर, रोशन जुमळे, आकाश तायडे, शरद मानकर, आणि सलोनी शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यास या उपक्रमाचा मोठा हातभार लागला. योग दिनाचा हा उपक्रम आरोग्य, एकता आणि आत्मशुद्धीचा सकारात्मक संदेश देणारा ठरला

Post a Comment

أحدث أقدم