प्रांतीय स्तरावर लॉयन्स क्लब संस्कृती, खामगाव ठरला 'नंबर वन'; विविध सेवा कार्यासाठी तब्बल १६ पुरस्कार

खामगाव, प्रतिनिधी : प्रांत ३२३४-एच२ च्या वार्षिक अधिवेशनात लॉयन्स क्लब संस्कृती, खामगावने उत्कृष्ट सेवा कार्याच्या बळावर 'नंबर वन क्लब'चा बहुमान पटकावत विविध सेवा उपक्रमांसाठी तब्बल १६ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. हा गौरव सोहळा रविवारी, २८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील आरजी इंटरनॅशनल हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

खामगाव व परिसरात सातत्याने सामाजिक, मानवतावादी आणि सेवाभावी उपक्रम राबविणाऱ्या लॉयन्स क्लब संस्कृतीने "Loving the World Pride Award" कार्यक्रमात आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटवत हा मानाचा सन्मान प्राप्त केला. या यशाबद्दल सर्व स्तरातून क्लबचे अभिनंदन होत आहे.

अधिवेशनाचे अध्यक्षस्थान प्रांतपाल लॉयन अश्विनकुमार बजोरिया यांनी भूषविले. यावेळी प्रथम उपप्रांतपाल लॉयन योगेश जयस्वाल, द्वितीय उपप्रांतपाल लॉयन सुप्रिया कोतवाल, माजी प्रांतपाल लॉयन गिरीश सिसोदिया, प्रांतीय सचिव लॉयन डॉ. प्रदीप गर्गे, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर लॉयन डॉ. कैलाश मुरारका यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार स्वीकारण्यासाठी क्लबचे अध्यक्ष लॉयन आकाश अग्रवाल, कोषाध्यक्ष लॉयन सीए आशिष मोदी, वरिष्ठ सदस्य लॉयन अजय एम. अग्रवाल, लॉयन राजकुमार गोयनका, लॉयन उज्वल गोयनका, लॉयन संजय उमरकर, लॉयन नरेश चोपडा तसेच लॉयन शिल्पा अग्रवाल उपस्थित होते.

यावेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. लॉयन नरेश चोपडा यांना इंटरनॅशनल प्रेसिडेन्शियल सर्वोच्च मेडल, लॉयन उज्वल गोयनका यांना 'बेस्ट लॉयन ऑफ द इयर' हा किताब, मेडल, सर्टिफिकेट व डायमंड अवॉर्ड प्रदान करण्यात आला.लॉयन संजय उमरकर यांना जीएमटी को-ऑर्डिनेटर म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट मेडल, सर्टिफिकेट आणि प्लॅटिनम अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच लॉयन राजकुमार गोयनका यांना डिस्ट्रिक्ट पीआरओ म्हणून उल्लेखनीय कार्याबद्दल डिस्ट्रिक्ट मेडल, सर्टिफिकेट व प्लॅटिनम अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

जाहिरात

क्लबचे अध्यक्ष लॉयन आकाश अग्रवाल यांना 'बेस्ट प्रेसिडेंट ऑफ द इयर' प्लॅटिनम अवॉर्ड, तर सीए आशिष मोदी यांना 'बेस्ट क्लब ट्रेझरर' डायमंड अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.क्लबचे सचिव लॉयन निशांत मुखिया यांना 'सर्वोत्कृष्ट क्लब सचिव' हा पुरस्कार, याशिवाय क्लबला सर्वोत्कृष्ट पर्यावरण सेवा, प्रशासन, छायाचित्र प्रदर्शन, GST, GMT, Hunger Relief, मानवतावादी सेवा, LCIF प्रचार व देणगी या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्राप्त झाले.

 झोन चेअरपर्सन लॉयन अभय अग्रवालj यांना डीजी प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सर्व पुरस्कारांमुळे लॉयन्स क्लब संस्कृती, खामगावच्या सेवाभावी कार्याची प्रांतीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेण्यात आली असून, ही संपूर्ण खामगाव शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.अशी माहिती डिस्ट्रिक्ट पीआरओ एमजेएफ लॉयन राजकुमार गोयनका यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم