नगरसेवक शोहरत खान यांच्याकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी स्वागत

खामगाव येथील नगर परिषद शाळा क्रमांक ४ मध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरसेवक शोहरत खान यांनी उपस्थित राहून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल देऊन उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आनंद आणि प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रत्येक मुलाला चॉकलेट तसेच शैक्षणिक पुस्तकेही भेट स्वरूपात वाटप केली.

यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती करून यशस्वी आणि उज्ज्वल भविष्य घडवावे, अशी मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा नगरसेवक शोहरत खान यांनी व्यक्त केल्या.



Post a Comment

أحدث أقدم