अमृत कॉन्व्हेंटच्या आवारात भला मोठा अजगर

सर्पमित्र राजू निळे यांचे तत्पर रेस्क्यू; बोथा जंगलात सोडून दिले, यापूर्वीही वर्गखोल्यांत निघाले होते साप!


खामगाव : शहरातील अमृत कॉन्व्हेंट शाळेच्या आवारात मंगळवारी (३० जून) भला मोठा अजगर आढळून आल्याने काही काळ शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. शाळेच्या परिसरातील एका रोपट्याखाली अजगर सुस्त अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने सर्पमित्र राजू निळे यांना पाचारण केले.

घटनास्थळी पोहोचलेल्या राजू निळे यांनी अत्यंत कौशल्याने अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर त्याला बोथा जंगल परिसरात नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. त्यामुळे एका वन्यजीवाला जीवदान मिळाले, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांवरील संभाव्य धोका टळला.

विशेष म्हणजे, अमृत कॉन्व्हेंट शाळेत यापूर्वीही अनेक वेळा वर्गखोल्या व परिसरात विविध प्रकारचे साप आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा परिसरातील झाडाझुडपांची नियमित साफसफाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم