लॉयन्स क्लब खामगावचा ५१ वा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
खामगाव :- लॉयन्स क्लब खामगावचा ५१ वा पदग्रहण समारंभ रविवारी स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व पदग्रहण अधिकारी म्हणून माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन *पीएमजेएफ लॉ द्वारकाजी जालान (पुणे)* उपस्थित होते.
यावेळी त्यांनी वर्ष २०२६-२७ साठी नवनिर्वाचित अध्यक्ष लॉ पिनेश कमानी, सचिव लॉ श्रमिक जैसवाल, कोषाध्यक्ष लॉ सागर गुर्जर, तसेच संचालक मंडळ व सर्व पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली . आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी लॉयन्स क्लबची सेवा परंपरा, प्रभावी नेतृत्व, संघटन कौशल्य आणि समाजसेवेची दिशा याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
याच प्रसंगी लिओ क्लब खामगावच्या नवनिर्वाचित अध्यक्ष लिओ सागर देशमुख, सचिव लिओ भूषण सूर्तीकर व कोषाध्यक्ष लिओ भीष्मा शर्मा यांनाही पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. सदस्य शपथविधी अधिकारी पीडीजी एमजेएफ लॉ डॉ. अशोक बावस्कर यांनी नवीन सदस्यांना लॉयन्स क्लबमध्ये प्रवेश देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच सुरू असलेल्या लॉयन्स इंटरनॅशनलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची माहिती देत नव्या सदस्यांना सेवाकार्यात सक्रिय सहभागाचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्त अध्यक्ष लॉ तुषार कमानी यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर निवृत्त सचिव लॉ गिरीश पवार यांनी वर्ष २०२५-२६ मधील विविध सेवा प्रकल्प, उपक्रम तसेच आर्थिक अहवाल सादर केला.
![]() |
| जाहिरात |
कार्यक्रमाला एलसीआयएफ समन्वयक लॉ मुरलीधर उपाध्याय, रीजन चेअरपर्सन लॉ अनिता उपाध्याय आणि झोन अध्यक्ष लॉ महेश चांडक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी रीजन व जिल्हास्तरावरील विविध सेवा उपक्रमांची माहिती दिली.विशेष आकर्षण म्हणून नुकतेच खामगाव येथे रुजू झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लॉयन्स क्लबच्या विविध समाजोपयोगी कार्यांचे, विशेषतः कोरोना काळात शासनाला दिलेल्या सहकार्याचे कौतुक करून भविष्यातही अशाच सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एमएससीडीएचे सचिव लॉ अनिलजी नावंदर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,लॉयन्स व लिओ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लॉ अशोक केला, लॉ शंकर परदेशी, लॉ राहुल भट्टड, लॉ किशोर गरड, लॉ नंदकिशोर देशमुख, लॉ निखिल लाटे, लॉ अभिजीत मेहता,लॉ लुकेश मुदलियार, लॉ मितेश कमानी, आनंद परदेसी, कमलेश नोवल, जितेन्द्र होतवानी तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन लॉ पूनम चांडक व लॉ रश्मि भट्टड यांनी तर आभार प्रदर्शन लॉ श्रमिक जैसवाल यांनी केले. असे क्लबचे जनसंपर्क अधिकारी लॉ धर्मेश शाह व लॉ कुलबीरसिंग पोपली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहिती दिली .



Post a Comment